Suresh Raina: सुरेश रैनाने केली क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, कारण…

Suresh Raina has announced his retirement from cricket because…

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने (suresh Raina) क्रिकेटच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे.रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून (cricket) निवृत्ती घोषणा (Retirement announcement) केली आहे. स्वतः रैनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. यावेळी रैनाने कृतज्ञता व्यक्त करत “माझ्या क्षमतेवर विश्वास (trust) दाखवणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार,” असं म्हणाला. देशाचं आणि उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी अभिमानास्पद होतं, असं म्हटलं.

पुढे सुरेश रैना म्हणाला की, “मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज, राजीव शुक्ला आणि माझ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो. ”तसेच निवृत्तीची घोषणा केली असली तरी सुरेश सैना १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी सीरिजमध्ये खेळणार आहे.

महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसात रैना गाझियाबाद येथील आरपीएल क्रिकेट मैदानावर सराव करताना दिसतोय.तसेच या काळात त्याने सीएसके आणि भारतीय संघाची जर्सी घातली होती. पण आता सुरेश रैना क्रिस गेल आणि कायरन पोलार्ड या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंप्रमाणे जगभरातील क्रिकेट लीग खेळणार असे दिसते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *