बदलत्या काळात आज प्रत्येकालाच इतरांपेक्षा वेगळं आणि वेगळं दिसावंसं वाटतं, पण इतरांपेक्षा वेगळं आणि आकर्षक दिसण्याच्या नादात काही लोक अतिशय विचित्र फॅशन्स फॉलो करून जगाला चकित करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत.
इंदुरीकर महाराजांच्या ‘त्या’ टीकेचा गौतमीने घेतला समाचार; म्हणाली, “महाराज फक्त…”
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मिरच्यांपासून ते भांड्यापर्यंत सर्व गोष्टींचा पोशाख परिधान करताना दिसत आहे, ज्याला पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओजमध्ये व्यक्ती अंगभर लाल मिरची लावून ड्रेस पराधीन केलेला दिसत आहे, तर कधी भांड्यांपासून बनवलेल्या ड्रेसमध्ये वेगळाच लूक पाहायला मिळत आहे.
चिंताजनक! कोरोनाच्या चौथ्या लाटेचे होतेय आगमन?
हे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर tik_toker_tharun नावाच्या अकाऊंटवर शेअर केले गेले आहेत, सध्या या व्यक्तीचे व्हिडीओ चर्चेत असून अनेकजण यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले, ‘उर्फीचा भाऊ मिर्ची जावेद.’ अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत.
तब्बल १२ तास पाण्यावर तरंगले बाबा, पाहण्यासाठी लोकांनी विहिरीजवळ केली तुफान गर्दी