Sushma Andhare । आत्ताची सर्वात मोठी बातमी! सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेल्या त्या व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Sushma Andhare

Sushma Andhare । शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या कायमच चर्चेत असतात. सध्या देखील त्यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांची एक गाडी दिसत आहे. त्याचबरोबर या गाडीत कैद्यांना काहीतरी पाकीट दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ ट्विटर वर शेअर करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Ajit Pawar । दिवाळी पाडव्याला अजित पवार गोविंद बागेत उपस्थित राहणार का? समोर आली मोठी माहिती

कोर्टामधून येरवडा कारागृहात कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीत कैद्यांना पाकीटे वाटण्याचा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले की, “उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली.. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड” असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

Eknath Khadse । एकनाथ खडसे अजूनही हॉस्पिटलमध्येच दाखल, नेमकी कशी आहे तब्येत? समोर आली मोठी अपडेट

हा व्हिडिओ पुण्यामधील जेल रोडचा आहे असं देखील सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे. सध्या या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला आहे.

Flight mode । काय असतो फ्लाइट मोड? तो कधी आणि कसा चालू करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Spread the love