सध्याच्या राजकारणात अनेक हालचाली झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक रोजच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह भाषणाच्या व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यामुळे सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात होणार वाढ
सुषमा अंधारे म्हणाल्या, “पक्षाने आदेश दिले तर मी राजीनामा देण्यास देईल. पण, माझा राजीनामा घेण्याआधी तुम्ही राज्यपाल कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेणार का?”, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटला? पंचसूत्री जाहीर करत अमित शहांनी साधला सुवर्णमध्य!
दरम्यान, या व्हिडिओनंतर महानुभाव पंथाने सुषमा अंधारे (Sushma Andhare) ज्या पक्षामध्ये असतील त्या पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
उद्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी दिली परवानगी