
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मनसेच्या एका नेत्याने जोरदार टीका केली आहे. यामध्ये त्यांनी सुषमा अंधारेंचा उल्लेख ‘स्टूलवाली बाई’ असा उल्लेख केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी कराड येथील मनसेच्या एका कार्यक्रमात ही टीका केली आहे.
धक्कदायक! पाकिस्तानमध्ये नमाजादरम्यान मशिदीत बॉम्बस्फोट; अनेकजण गंभीर जखमी
यावेळी ते म्हणाले की,”सुषमा अंधारे यांच्यासाठी आता मी नवीन शब्द वापरतोय तो म्हणजे ‘स्टूलवाली बाई’.” दरम्यान सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना ‘स्टूलवाली बाई’ म्हणण्याचा संदर्भ देताना त्यांनी मृणालताई गोऱ्हे यांचा खास संदर्भ दिला आहे.
बिग ब्रेकिंग! बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी, उद्या शिक्षा सुनावली जाणार
कधीकाळी मुंबईमध्ये मोर्चे निघायचे तेव्हा अहिल्याताई रांगडेकर, मृणालताई गोऱ्हे या सर्वांच्या समोर असायच्या. यावेळी मृणालताई गोऱ्हे यांना खास पाणीवाली बाई म्हंटल जायचं. त्या महागाई व पाण्याच्या प्रश्नांवर लोकांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.
पाण्यावर अचानक जोरात धावू लागला कुत्रा, कुत्र्याचा स्टंट पाहणारी मंडळी कोमात; पाहा VIDEO
मात्र सुषमा अंधारेंनी आजपर्यंत कुठलेही कर्तृत्व गाजवलेले नाही. तसेच त्यांनी कुठल्याही प्रश्नाला हात घातलेला नाही. व्यासपीठावर जाऊन त्यांनी कुठलाच प्रश्न सोडवलेला नसून सुषमा अंधारे पोकळीतून निर्माण झालेले नेतृत्व आहे. याआधी त्या कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर होत्या. आता त्या शिवसेनेच्या (Shivsena) व्यासपीठावर येऊन बोलत आहेत.
ऋषभ पंतच्या तब्येतीबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट!
सुषमा अंधारेंनी बाळासाहेब ठाकरेंना 80 वर्षांचा म्हातारा म्हंटले. इतकंच नाही तर संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि हिंदू देव-देवतांबद्दल त्यांनी आक्षेपार्ह विधानं केली आहेत. मात्र संपूर्ण वारकरी समाज रस्त्यावर आला तरी सुद्धा उद्धव ठाकरे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. ही कुठली लाचारी आहे?” असा प्रश्न देखील काळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.