Sushma Andhare । सर्वात मोठी बातमी! सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; नागपूर विमानतळावर धक्कादायक घटना

Sushma Andhare

Sushma Andhare । शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत नागपूर विमानतळावर धक्कादायक प्रकार घडला आहे. एक अज्ञात व्यक्ती सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी देत विमानतळावर तसंच ‘जय श्रीराम’च्या घोषणाही देत निघून गेला. या घटनेचा खुलासा सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत केला आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पक्षाच्याच दोन मोठ्या नेत्यांना झटका

सुषमा अंधारे नागपूर विमानतळावरून मुंबईसाठी जात होत्या, तेव्हा एक 6 फूट उंच व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्यांना धमकी दिली. त्याच्या शरीरावर गंध लावलेला होता आणि त्याचे डोकं अर्धे टक्कल होते. सुषमा अंधारेंनी या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांना जिवे मारण्याची धमकी देत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत धावत्या गाडीतून निघून गेला.

Eknath Shinde । मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांना एकनाथ शिंदें यांनी दिला मोठा सल्ला; म्हणाले…

या घटनेनंतर, सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पोस्ट लिहित, या घटनेचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करण्यात यावा अशी मागणी केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं की, शासनाने त्यांना सुरक्षा पुरवावी असं त्यांना वाटत नाही, कारण त्यावर त्यांचा विश्वास नाही. सुषमा अंधारे यांचा हा संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Allu Arjun । ‘या’ धक्कादायक कारणामुळे अल्लू अर्जुनला अटक, वाचून व्हाल थक्क

Spread the love