
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. यावेळी सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहिल्या. आता यांना भाजपने खोचक टोला लगावलाय. भाजप नेते आषिश शेलार यांनी सुषमा अंधारे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मोठी बातमी! अज्ञात आंदोलकांनी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवला
भाजतो नेते आषिश शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, दुसऱ्या पक्षामध्ये कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा बरा नाही. त्यामुळे मी सुषमा अंधारे यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचे आडनाव बदलून सुषमा आगलावे करावे. असा खोचक टोला आशिष शेलार यांनी सुषमा अंधारे यांना लगावला आहे.
हृदयद्रावक! १० महिन्याच्या चिमुकलीचा अंगावर गरम पाणी सांडून मृत्यू
त्याचबरोबर त्यांनी मनिषाताई यांचच्याकडे पहावे आणि आणि त्यांची काय स्थिती झाली, हे समजून घ्यावे, असा टोला देखील शेलारांनी लगावलाय. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी शिवसेनेमध्ये (Shivsena) प्रवेश केल्यानंतर त्यांना उपनेतेपद देण्यात आले होते.
आंदोलन करून प्रश्न सुटले नाहीत तर १८ तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचा गंभीर इशारा