“तु तेव्हा तशी” झी मराठीवरील ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम देत आहे. या मालिकेच्या मुख्यभुमिकेमध्ये शिल्पा तुळसकर (Shilpa Tulsakar) आणि स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आहेत. आता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांचा इंटिमेट सिन देतानाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी बेलवंडी फाटा येथे भाजीपाला संकलन केंद्र सुरु
या मालिकेमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिका साकारत आहेत. स्वप्नील ‘सौरभ’ची तर शिल्पा ‘अनामिका’च्या भूमिकेत आहे. सध्या या मालिकेचा नुकताच एक प्रोमो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये स्वप्नील आणि शिल्पा दोघांचा बेड सीन दाखवण्यात आला आहे.
पश्मिना रोशनसोबतच्या अफेअर बद्दल कार्तिक आर्यनने सोडले मौन; म्हणाला, “एखाद्या मुलीसोबत….”
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. सौरभ व अनामिका एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. त्यामुळे या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
Ajit Pawar: अजित पवारांनी बारामतीचा रेडा घेऊन गुवाहाटीला जावं – अब्दुल सत्तार