
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Tarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवले आहे. मागील 14 वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मागील काही महिन्यांपासून ही मालिका संपणार असल्याची चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक मालव राजदा यांनी काही महिन्यांपूर्वी हा कार्यक्रम सोडला होता. दरम्यान आता त्यांनी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे.
के एल राहूलला लग्नामध्ये विराट कोहलीने गिफ्ट केली BMW कार! किंमत ऐकून व्हाल थक्क
या मालिकेचा छोटा प्रोमो देखील त्यांनी प्रदर्शित केला आहे. ‘प्रोफेसर पांडे के पांच परिवार’ असे या कार्यक्रमाचे नाव असणार आहे. यामध्ये अभिनेता संदीप आनंद हा मुख्य भूमिकेत असणार आहे. याशिवाय जय पाठक, सोनू चंद्रपाल, जयश्री सोनी, सोनिया कौर, मधुश्री शर्मा आणि प्रभा कौर हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचं निधन
या मालिकेमुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हंटले जात आहे. एकीकडे या मालिकेतील एक एक कलाकार मालिकेतून बाहेर पडत आहे तर दुसरीकडे मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांच्या प्रोडक्शन हाऊस (Rajda Production) मध्ये वाद झाल्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत अजून कोणतेही स्पष्ट विधान करण्यात आलेले नाही.