
मुंबई : आज केशव सीताराम ठाकरे (Keshav Sitaram Thackeray) उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते, थोर समाजसुधारक (Social reformer) होते. दरम्यान त्यांच्या जयंतनिमित्त अनेक नेत्यांकडून आज त्यांना अभिवादन (greetings) करण्यात आले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करताना के. सी ठाकरे असा उल्लेख केला. दरम्यान यावरून मनसे (MNS) नेते चांगलेच संतप्त झाले असून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मनसे नेते संतप्त झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तातडीने हे ट्विट डिलीट करून नव्याने ट्विट केल आहे.
Raju Shetty: पशुपालक शेतकऱ्यांनी येत्या १० दिवसात जनावरांचा विमा उतरावा; राजू शेट्टींची मागणी
सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये नेमक काय लिहिलं ?
सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी, “सत्यशोधक विचारांचा वसा घेऊन त्यासाठी आयुष्यभर लढा देणारे प्रबोधनकार के.सी ठाकरे यांची आज जयंती, यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन” अशी पोस्ट केली. दाम्यान केलेल्या या पोस्टवरील फोटोवर के. सी ठाकरे हे नाव ठळक अक्षरात दाखवण्यात आले तर प्रबोधनकार अगदी छोट्या शब्दात लिहिले होते. म्हणून या ट्विटवरून वाद निर्माण झाला असून मनसे नेते संतप्त झाले. दरम्यान वातावरण तापताच सुप्रिया सुळेंनी ते ट्विट डिलीट केले आणि नव्याने पुन्हा एक ट्विट केले.
नव्याने केलेलं सुप्रिया सुळेंच ट्विट
“संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील खंबीर नेतृत्व, थोर समाजसुधारक, कणखर पत्रकार प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. दरम्यान यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ” असं नव्याने केलेल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळेंनी उल्लेख केला आहे.
मनसेचे संदीप देशपांडे यांचा आक्षेप
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सुप्रिया सुळेंच्या याच ट्विटवर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी देशपांडे म्हणाले की “ताई, तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंना के.सी ठाकरे म्हणण्या एवढ्या मोठ्या ताई झाला नाही”, अशी मनसेचे सरचिटणीस देशपांडे यांनी सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली.
मनसेकडून सुळेंच्या ट्विटवर आक्षेप घेतल्यानंतर तातडीने सुप्रिया सुळे यांनी ट्विट डिलीट केले आणि नव्याने दुसरे ट्विट केले.