नैसर्गिक वातावरणाचा पिकांवर मोठ्या प्रमाणात फरक पडत असतो. सध्या उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी सुरू आहे. आणखी दोन दिवस ही थंडी अशीच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या थंडीचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
‘हेरा फेरा ३’साठी अक्षय कुमारने मागितले ‘इतके’ कोटी मानधन; वाचा सविस्तर
रब्बी हंगामातील ( Rabbi Season) पिके थंडीला अनुकूल असली तरी अत्यंत कमी तापमानात पिकांवर वाईट परिणाम होतो. सध्या सुरु असलेल्या थंडीच्या महाभयंकर लाटेमुळे केळी, पपई, ( Banana and Papaya) या पिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. या पिकांची वाढ खुंटन तसेच क्रॅकिंग होणे अशा समस्या थंडीचा दिवसात निर्माण होतात.
थंडीच्या दिवसांत केळीच्या व पपईच्या बागांची विशेष काळजी घ्यावी लागते. यावेळी केळीच्या घडांना प्लास्टिक पेपरने अच्छादन करावे. यामुळे थंडीचा फारसा फरक केळींवर पडत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपायाने केळी सुरक्षित राहतात.
“मला काही झालं तर…”, संजय राऊतांचा राज्य सरकारला गंभीर इशारा
याशिवाय रात्रीच्या वेळी केळी व पपईच्या बागांना पाणी द्यावे. यामुळे बागांमधील तापमान नियंत्रित राहते. तसेच अतिथंडी असलेल्या बागांमध्ये शेकोटी करावी. याचा फायदा बागांना होतो. अशाप्रकारे थंडीच्या दिवसांत केळी व पपईच्या बागांची तुम्ही काळजी घेऊ शकता.
ब्रेकिंग! भगतसिंग कोश्यारींची राज्यपाल पदावरुन होणार हकालपट्टी?