
मुंबई : कमी पैसा आणि कमी जागेत व्यवस्थित उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन. शेळीपालनाला खर्च हा फार कमी लागत असतो, आणि मोठा नफा यातून मिळत असतो. आणि हेच अमलात आणत शेतकरी शेतीसोबत शेळीपालन व्यवसाय (Goat rearing business) करून चांगले उत्पादन घेत असतात. परंतु शेतकऱ्यांना गाभण शेळ्यांची काळजी कशी घ्यावी हे माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून शेळी पालनातून काही नुकसान होणार नाही?जाणून घ्या शेळीपालन व्यवसायामध्ये गाभण शेळ्यांचे संगोपन कसे करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठीने या गाभण शेळ्यांचा आहार आणि आजाराविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
गाभण शेळ्यांचा आहार
1) गाभण शेळ्यांना वाळलेला, ओला चारा, खुराक व खनिज मिश्रण यांचा पुरवठा योग्य प्रमाणात द्यावे.
2) शेळ्यांच्या गाभण काळातील शेवटचा किमान 1 महिना व्यायच्या अगोदर समतोल आहाराचा पुरवठा करा.
3) गाभणकाळातील शेळ्यांच्या शेवटच्या 3-4 आठवड्यामध्ये पिल्लांच्या उत्तम वाढीसाठीचांगल्या चाऱ्यासोबत दररोज 250 ते 350 ग्रॅम खुराक द्यावी.
4) स्वच्छ पाणी द्याव. जर थंड पाणी किंवा पावसाचे पाणी दिले तर यामुळे शेळ्यांना सर्दी सारखे आजार होतात.
5)पावसाळ्यात गाभण शेळ्यांना सुका चारा द्या. यामध्ये भरडलेला मका, गहू सोयाबीन यांचे मिश्रण करून द्यावे.
6)गाभण शेळ्यांना गोठ्यातच फिरण्याची सोय करा.