शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून सरकार अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. मात्र काही सरकारी अधिकारी शेतकऱ्यांची लूट करताना दिसत आहेत. गोरगरीब अडाणी शेतकऱ्याची सरकारी अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लूट होते. दरम्यान याच पार्शवभूमीवर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधील एका सरपंचाने अनोखं आंदोलन केलं. सध्या या आंदोलनाची सगळीकडे जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
पॉर्न व्हिडीओ पाहताना पकडला भाजपचा आमदार; यांनतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने आमदाराची लाजच काढली
संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री (Fulambri) पंचायत समितीसमोर एका सरपंचाने शेतकऱ्यांसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी लाच मागतात यामुळे संतप्त होऊन सरपंचाने (Sarpanch) थेट गळ्यात २ लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून आले आंदोलन केले आहे.
विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या स्कुल बसचा भीषण अपघात! विद्यार्थ्यांसह शिक्षकही जखमी
सरकार या अधिकाऱ्यांना लाख दीड लाख पगार देते तरीदेखील हे अधिकारी शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करून घेण्यासाठी गोरगरिबांकडून पैसे घेतात. असा गंभीर आरोप या सरपंचाने केला आहे. यावेळी या सरपंचाने अशा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर लाख रुपये उधळतोय, हे पैसे घ्या आणि विहिरी द्या. अजूनही नाही काम झालं तर शेतकऱ्यांकडून आणखी पैसे आणतो मात्र शेतकऱ्यांना विहिरी द्या, अशी मागणी केली आहे. (Take money and give wells)
पुणे पोटनिवडणुकीवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “माणुसकी प्रकार आहे की नाही….”
सध्या या आंदोलनाची सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. या सरपंचाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनोखं आंदोलन केलं आहे. त्यामुळे या सरपंचाचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.
‘आर्चीची’ भूमिका नाकारली आता पच्छाताप होतोय का? सायली पाटील म्हणाली…