दगडखाणी बंद करून दंडात्मक कारवाई करा; महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Take punitive action by closing down quarries; Revenue Minister's order to Collectors

नाशिक : महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखेपाटील ( Radhakrishn VikhePatil) यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यामध्ये महसूल यंत्रणेच्या कामकाजाचा व लम्पी आजाराबाबत सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनधिकृत दगडखाणी बंद करून दंडात्मक कारवाई करावी असा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; भाजपच्या ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व दगड खाणींची इटीएस मशिनद्वारे (ETS Machine) मोजणी करावी. याशिवाय अनधिकृत गौण खनिजांच्या वाहतुकीला आळा बसण्यासाठी एसओपी तयार करण्यात यावे. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

दरम्यान लम्पी ( Lumpi) आजाराबाबत सद्यस्थितीचा आढावा घेत असताना विखेपाटील यांनी या आजाराबाबत माहिती अपडेट होण्यासाठी पोर्टल तयार करण्यास सांगितले आहे. यावर शेतकऱ्यांसाठी लम्पी आजाराबाबत सर्व माहिती देण्यात यावी व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेमध्ये या आजाराबाबत जनजागृती करावी असे आदेश देखील यावेळी देण्यात आले.

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; 205 किलो कांदा विकून हाती आले फक्त 8 रुपये!

राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण थांबविण्यात आले असले तरी याठिकाणी व्यापारी गाळे असल्यास त्वरित कारवाई करावी असा निर्णय राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिला आहे. याशिवाय प्रशासकीय स्तराववरील वाळू लिलाव प्रक्रिया होणार नाही. वाळूबाबत शासन स्तरावर लवकरच नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली.

गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *