Sajay Raut । मुंबई : भाजप नेते (BJP) आणि ठाकरे गटाचे नेते सतत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आमनेसामने येतात. त्यावरून राजकीय वातावरणही अनेकदा तापलेले पाहायला मिळते. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरून राज्याचे राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Latest Marathi News)
Share Market । जबरदस्त कमाई करायचीय? तर लगेचच करा ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक, पहा यादी
देशभरातील लोक अयोध्येतील राम मंदिराचं उद्धाटन कधी होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हिंसाचार होऊ शकतो, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. आता त्यावर नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी एटीएस प्रमुखांना एक पत्र लिहिले आहे. “राऊत यांचे देश विरोधी संघटनेशी संबंध असून त्यांची नार्को टेस्ट करा”, अशी आक्रमक मागणी नितेश राणे यांनी केली आहे. (Nitesh Rane Wrote Latter To ATS about Sajay Raut Statement)
Ajit Pawar । भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का! १५ दिवसांतच बदलला ‘तो’ निर्णय
“संजय राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानची स्तुती करणाऱ्या वृत्तींना ते आपला आदर्श समजत आहेत. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडे असलेली संभाव्य दंगलीची अचूक माहिती प्राप्त करावी”, असे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन, प्रथम येणाऱ्यास 50 हजारांचे बक्षीस
इतकेच नाही तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पाकिस्तानी एजंट आहे का? असा संतप्त सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करा, अशी मागणी देखील करणार असल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.