संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखीचे काल प्रस्थान झाले आहे. या पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. अनेकजण या पालखी सोहळ्यामध्ये सामील होऊन भक्तिमय वातावरणात रमून जातात. अगदी तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण यामध्ये सामील होतात. मात्र काल या पालखीला सोहळ्याला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे.
दहावी आणि बारावी शाळेमध्ये प्रथम क्रमांक आला असेल तर मिळवा दहा हजार रुपये, जाणून घ्या..
काल सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे दिसत आहे. या घटनेने राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले. अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारवर गंभीर आरोप केले मात्र फडणवीसांनी ते आरोप फेटाळून लावले. फडणवीस म्हणाले, आळंदीत कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही न घडलेल्या गोष्टींचं राजकारण करू नये. मात्र सध्या पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात! ४ जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी
वारकरी विशाल पाटील यांनी व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, पोलिसांनी आम्हाला उचलून मारले, सुमारे 15 ते 20 पोलिसांनी चार जणांना बेदम मारहाण केली असल्याचं म्हंटल आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी आम्हाला का मारले? याचे उत्तर देण्याची मागणी आता या वारकऱ्यांकडून होत आहे.
Sharad Pawar । शरद पवार धमकी प्रकरणी हाती लागली मोठी माहिती!
हे पाहिले का