
सध्या होळीचा उत्सव सगळे आनंदात साजरा करत आहेत. याचे काही गमतीशीर तर काही धक्कादायक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या देखील असाच एक धक्कदायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोठी बातमी! OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन
दिल्लीतल्या पहाडगंज भागातला व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही मुलं ही एका जपानी तरूणीशी अश्लील वर्तन करताना दिसत आहेत. होळी खेळण्याच्या नावाखाली हे गैरवर्तन केलं गेलं आहे. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे.
धक्कादायक घटना! इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात बुडाले 55 हजार रुपये!
हा व्हिडीओ Sweety या ट्विटर अकाऊंटवरून देखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर आता अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ही भारताची संस्कृती नाही’ अशा देखील प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.
Japanese tourist in india pic.twitter.com/oAShCwdZ4j
— Sweety (@Sweety52216366) March 9, 2023
सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिली धक्कदायक माहिती