Takkal Virus in Buldhana News । बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा प्रकोप वाढला, ICMR चेन्नई पथक करणार तपास

Buldhana News

Takkal Virus in Buldhana News । बुलढाणा जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून टक्कल व्हायरसने थैमान घातले आहे. शेगाव तालुक्यातील अकरा गावांमध्ये या व्हायरसने अनेक लोकांना प्रभावित केले आहे. या गावांमध्ये 139 लोकांच्या केसगळतीच्या घटना समोर आल्या असून, त्यावर उपचार सुरू आहेत. तथापि, टक्कल पडण्याचे नेमके कारण अद्याप शोधले गेलेले नाही.

Gurucharan Health Update । तारक मेहताच्या सोढीची प्रकृती गंभीर, 19 दिवसांपासून अन्नपाणी सोडले

सुरुवातीला या केसगळतीला फंगल इन्फेक्शन किंवा पाण्यामुळे झालेली समस्या मानली जात होती. लोणार सरोवराच्या पाण्यामुळे या व्हायरसचा प्रसार झाला असावा, असा अंदाज देखील लावला गेला होता. अनेक लोकांमध्ये केसगळती सुरू झाल्याने अंघोळ करण्यापासून ते इतर शारिरीक देखरेखीपर्यंत काही लोकांनी आपली रोजची दिनचर्या बदलली आहे. मात्र प्रशासनाने या समस्येवर ठोस पावलं उचलली नाहीत.

Maha Kumbh Mela 2025 । महाकुंभ 2025 चे शुभारंभ, पहिल्या शाही स्नानासाठी भाविकांची गर्दी

या प्रकरणात आता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल सायन्सेस (ICMR) चे चेन्नई आणि दिल्ली येथील पथक बुलढाण्यात दाखल होणार आहे. ICMR चे पथक आज दुपारी बुलढाण्यात पोहोचेल आणि इथल्या पाण्याचे नमुने घेऊन, लोकांच्या केसगळतीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करेल. या तपासामुळे टक्कल व्हायरसच्या प्रकोपाचे कारण समोर येण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Santosh Deshmukh Case । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का

सध्या, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक आणि प्रशासन या समस्येवर विचार करत असून, येणाऱ्या तपासानंतर यावर योग्य उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे.

Spread the love