‘सैराट’ चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली आर्ची फेम रिंकू राजगुरू ( Rinku Rajguru) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे विविध लुक्स मधील फोटो व व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. इतकंच नाही तर तिच्या लुक्स मुळे ती चर्चेत देखील असते. नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील तिच्या लुकमुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे.
लग्नात फटाके वाजवणे पडले महागात; ऊसाला आग लागून लाखोंचे नुकसान!
सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘पठाण’ (Pathan) चित्रपटातील एका गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बेशरम रंग या गाण्यावरील रिंकुचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये असणाऱ्या तिच्या लुकची मात्र प्रचंड चर्चा होत आहे.
अभिनेता रितेश देशमुखचा मोठा खुलासा; म्हणाला,”आम्ही दोघेही सिगारेट…”
या व्हिडीओमध्ये रिंकूने खास लूक केला आहे. ज्यामध्ये तिने मोत्याचे इअरिंग्स, मोत्याचं गळ्यातलं आणि पिंक कलरचा प्रिंटेड ड्रेस घातला आहे. रिंकूच्या या व्हिडीओवर व लुकवर कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. तर काहींनी तिच्या लुकची वाहवा केली आहे. काही नेटकऱ्यांनी तर ‘एवढा पैसा आलाय तर तो दात का काढत नाहीस…’ अशा कमेंट दिल्या आहेत. शिवाय गाणे निवडण्यावरून देखील तिला ट्रोल करण्यात आले आहे.
अंबानींच्या एंगेजमेंट कार्यक्रमात १० मिनीट नाचायला मिकासिंगने घेतले ‘इतके’ कोटी रुपये