परतीच्या पावसानं (Returning rain) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) धुमाकूळ घातला होता. या पावसानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. तर दुसरीकडे या परतीच्या पावसाचा फटका काळू-बाळूच्या फडासह अनेक तमाशाच्या फडांना (the pageant) बसला आहे. इतकंच नाही तर विदर्भ (Vidarbha), खानदेशातील अनेक प्रयोग ठप्प झाले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारे सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील ‘काळू-बाळू’चे (kalu-balu) मोठे तमाशे तात्पुरते बंद पडले आहेत. याच मुख्य कारण म्हणजे परतीचा पाऊस. याआधी कोरोनामुळं दोन वर्ष प्रेक्षकांनी फडाकडे पाठ फिरवली होती.
कापसाला किमान 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
कोरोना आणि इतर कारणांमुळे तमाशा बंद असल्यामुळे उपासमार आणि आर्थिक चणचण सुरू आहे. तर आता यंदाच्या परतीच्या पावसामुळे विदर्भ, खान्देशात तमाशाचे प्रयोग ठप्प आहेत. रिवाजानुसार यावर्षी विजयादशमीला केवळ आठच फड लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. पण परतीच्या पावसाचा त्यांनाही फटका बसला. दरम्यान एक-दोन शो करून हे फड विदर्भ आणि खान्देशात हे सर्व कलाकार हातावर हात ठेऊन बसले आहेत.
धक्कादायक! गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण होरपळले, तर १० जण गंभीर जखमी; वाचा सविस्तर
दरवर्षी दसऱ्यानंतर काळू-बाळूची तमाशा टीम प्रयोगासाठी बाहेर पडते. परंतु यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाडासह अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा काळू बाळू तमाशा फड मालकांनी आता थेट जानेवारीतच प्रयोगासाठी बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. तिकीट काढून तमाशा पाहण्यास येणारा प्रेक्षक वर्गही दिवसेंदिवस खूपच कमी होत चालला आहे. तमाशाला 80 रुपये इतका तिकीट दर आहे. दरम्यान तमाशाला आता केवळ 35 ते 40 प्रेक्षकच येत असतात. थोड्याशा प्रेक्षकांमुळे तमाशा कलावंतांच्या गल्ल्यातून काहीच खर्च भागत नाही. त्यामुळे हे फड बंद ठेवले आहेत.
साखर कारखान्यांचे वजन काटे तातडीने ऑनलाईन करा, राजू शेट्टी यांची वैद्यमापन नियंत्रकांकडे मागणी
दरम्यान गावोगावच्या सुरू होणाऱ्या यात्रांवर आशा लावू फड मालक बसले आहेत. दरम्यान यंदाच्या वर्षी या सहा फड मालकांनी यात्रा कमिटीकडून ‘सुपारी’ घेऊन शो करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात जवळपास 225 लहान-मोठे फड आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रत्येकवर्षी दसऱ्याला सर्व तमाशाचे फड बाहेर पडतात. फड बाहेर पडण्यापूर्वी महिनाभर त्यांना कलाकारांची जुळवा-जुळव, त्यांचा पगार, वाहनांची दुरुस्ती, लाईट व्यवस्था या सर्व गोष्टींचं नियोजन करावं लागत. यासाठी त्यांना किमान 15 ते 20 लाख रुपये लागतात.
अभिनेत्री अमृता सुभाष ४३ व्या वर्षी होणार आई?, इन्स्टाग्राम पोस्टने वेधल सर्वांचं लक्ष