Tanaji Sawant Car Accident । महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या ताब्यातील कारचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. दोन गाड्या एकमेकांना धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. (Tanaji Sawant Car Accident)
Train Accident । धक्कादायक! डब्यात चढताना महिला लेकरांसह रुळांवर पडली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून ज्योतिबाला जात असताना तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती देखील मिळत आहे. तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केलेली जात आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार तानाजी सावंत यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
Manoj Jarange Patil । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली
याबाबत अधिकची माहिती अशी की, अंबाबाईचे दर्शन घेऊन तानाजी सावंत ज्योतिबाच्या दर्शनाला चालले होते. यावेळी वाटेतच त्यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाला. तानाजी सावंत ज्या गाडीत बसले होते त्यांच्या पाठीमागच्या गाडीने धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. धडक देणाऱ्या गाडीच बोनेट चेंबलेले दिसत आहे.
Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली पुढची रणनीती