Hindu son: पाकिस्तानी लेखक तारेक फतेह यांचे आज दुःख निधन झाले आहे. Pakistani Writer Tarek Fatah left the word today पाकिस्तानमध्ये जन्मलेले आणि स्तंभलेखन व प्रसिद्ध लेखक तारेक फतेह यांनि आज वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पाकिस्तानमधील ( Pakistan ) लेखक तारेक फतेह यांचे कर्करोगामुळे कॅनडामध्ये दुःखद निधन झाले आहे. या दुःखद वार्तेची पुष्टी त्यांची मुलगी नताशा फतेह हिने केले आहे.
कराडमधील तरुणाने ड्रीम ११ मध्ये जिंकले १ कोटी २० लाख रुपये; आई वडील भावुक होत म्हणाले…
“पंजाबचा सिंह म्हणून ओळखले जाणारे…भारताचा सुपुत्र म्हणून नावारूपास येणारे… कॅनडातील स्थानिक आणि सत्यासाठी लढणारे… दिन दलितांना न्याय मिळवून देणारे आणि लोकहितवादी… दीनदुबळ्यांसाठी लढणारे… आज कायमचे माती आड झाले आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांची हीच चळवळ पुढे चालू ठेवतील. तुम्ही आमच्या मध्ये सामील होताल का? १९४९-२०२३ असे नताशा ने ट्विटरवर ट्वीट केले आहे.
इस्लामी धर्माची चिकित्सा आणि त्याबद्दल टोकाची भूमिका ठेवणारे म्हणून यांना ओळखले जात होते. त्यांनी भारतामध्ये अनेकदा भाजपाच्या (BJP) नेतृत्वाखाली NDA सरकारचं कौतुक केलेले होते. १९४९ साली पाकिस्तान मध्ये जन्म आणि १९८० मध्ये कॅनडात स्थलांतर करणारे व तेथे राजकीय कार्यकर्ते, पत्रकार टेलिव्हिजन निवेदक, म्हणून आपले नाव गाजवणारे तारेक फतेह अखेर पडद्याआड झाले आहेत.