शिक्षक (Teacher) हे मुलांना ज्ञान देणारे असतात ना की जीव घेणारे. सध्या कर्नाटक (Karnataka) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षक या विद्यार्थ्याला फक्त मारूनच राहिला नाही तर पहिल्या मजल्यावरून खाली देखील फेकून दिले.
ठाकरे गटाला मोठा धक्का! सेनेचं कार्यालय मिळालं शिंदे गटाला
सध्या या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली अशी की, या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा लोखंडीं रॉडने (Iron rod) मारले आणि नंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरील फेकून दिले. या घटनेत त्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग: मुंबई हायकोर्टाचा गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मोठा निर्णय
शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला एवढं बेजबर का मारलं याबाबत अजून कोणताही खुलासा झालेला नाही. मात्र, शिक्षक फरार आहे. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा (Police system) करत आहे.