
Team India Victory Parade | T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया आज मायदेशी परतली आहे. देशासाठी विजेतेपद पटकावल्यानंतर आलेल्या भारतीय संघाची झलक पाहण्यासाठी मुंबईच्या मरिन ड्राइव्हवर चाहत्यांची गर्दी उसळली आहे. चाहत्यांची ही प्रचंड गर्दी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना मरिन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांची वाहतूक गैरव्यवस्थापन किंवा गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.” मरीन ड्राईव्ह आणि आजूबाजूला गर्दी आणि रहदारीचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.
Restart and Reboot । स्मार्टफोन रीस्टार्ट आणि रीबूट यामध्ये काय फरक आहे? वाचा एका क्लिकवर
आज मुंबईत पोहोचलेल्या टीम इंडियाचे भव्य स्वागत करण्यासाठी चर्चगेटजवळील नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या 1 किलोमीटरच्या नयनरम्य मरीन ड्राइव्ह मार्गावर हजारो उत्साही चाहते आणि क्रिकेटप्रेमी रांगेत उभे होते. नरिमन पॉइंट ते चर्चगेटपर्यंतचा संपूर्ण परिसर चाहत्यांनी खचाखच भरला होता आणि वानखेडे स्टेडियम दुपारपासून तिथे जमलेल्या गर्दीच्या घोषणांनी आणि जयजयकाराने दुमदुमले होते.
Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला इशारा