हार्दिक पांड्यावर टीम इंडियाची जबाबदारी? आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना मिळणार संधी

Team India's responsibility on Hardik Pandya? The players who perform tremendously in the IPL will get a chance

सध्या चालू असलेल्या IPL (Indian Premier League) मॅचमध्ये बऱ्याच खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन दाखवला आहे. आयपीएलचा सीजन संपला की क्रिकेट चाहत्यांचे लक्ष मालिका क्रिकेकडे जाते. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये ODI (One Day International) छोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यामध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे चांगले नेतृत्व करू शकतो. भारताचा द्वितीय श्रेणी संघ अफगाणिस्तान विरुद्ध खेळू शकतो. बीसीसीआयने (BBCI) अफगाणिस्तान विरुद्ध होम सीरिजची योजना आखली, पण काही वृत्तांनी अशी माहिती दिली आहे की, वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड स्वदेशात होणारी ही मॅच रद्द करण्याचा विचार करत आहे.

The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ च्या उलट सुलट चर्चांवरून अदा शर्मा भडकली! म्हणाली, “तुमची आई, बहीण, प्रेमिका…”

परंतु नवीन माहितीनुसार, भारताचा युवा संघ अफगाणिस्तान विरुद्धची मालिका स्वदेशातच खेळू शकतो. या मालिकेसाठी वनडे व कसोटी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबतच सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये विराट कोहलीचा (Virat Kohli) देखील समावेश असू शकतो.

गौतमीच्या ‘पाटील’ आडनावाच्या वादात सुषमा अंधारेंची उडी; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “जे काम व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर…”

वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर जाण्याआधी बीसीसीआयकडुन हा निर्णय घेण्यात आला आहे. पीटीआयच्या (PTI) म्हणण्याप्रमाणे, बीसीसीआयने २०-३० जूनला बराच वेळ असल्यामुळे ही मालिका छोट्या स्वरूपात आयोजित करण्याचं ठरवलं आहे. या मॅचचे रूपांतर टी-२० किंवा एक दिवसीय मालिकेमध्ये होऊ शकते. या मॅचमध्ये हार्दिक पांड्या कर्णधार असेल. भारताच्या युवा खेळाडूंना या मालिकेमध्ये मोठी संधी दिली जाणार आहे.

शाळेत दोन शिक्षिकांची लागली भांडणे! प्रकरण एवढे तापले की, एकमेकींना लाथा आणि ठोसे मारत केसही ओढले; व्हिडीओ पाहून बसेल धक्का

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मीरवाइज अश्रफ (Mirwais Ashraf) हे आयपीएलच्या फायनल मॅचसाठी भारतात आलेले आहेत. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील प्रस्तावित क्रिकेट मालिकेबाबत आशियाई क्रिकेट परिषदेच्या संसदीय बैठकीसाठी देखील ते आले आहेत. आयपीएल २०२३ मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड, (Rituraj Gaikwad) यशस्वी जयस्वाल, (Yashasvi Jaiswal) तिलक वर्मा, (Tilak Verma) या खेळाडूंना अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडिया मध्ये खेळण्याची संधी लाभू शकते.

‘स्वतःच्या सोयीनुसार वापरलं…’; अखेर घटस्फोटवर मानसी नाईकने व्यक्त केली मनातली सल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *