
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारण्यावरून वक्तव्य केले आहे. यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज ( Chh. Shivaji Maharaj) यांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नका”, असे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले आहेत.
बाबा रामदेव पुन्हा बरळले, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी केले वादग्रस्त विधान
जुन्नर येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या मोहिमेची काल (दि.३) सांगता सभा होती. या सभेत बोलताना संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी अश्रू अनावर होऊन ते म्हणाले की, “अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र हा बेशरमपणा करु नये. जगाचा बाप हा हिंदुस्थान असून याचे उत्तर सारे देश देतील.”
प्रसिद्ध युट्युबर अरमान मलिकने केले तिसरे लग्न? पहिल्या दोन पत्नी आहेत गरोदर
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हिंदू पंचांगातील तिथीनुसार साजरी व्हायला हवी. असे देखील संभाजी भिडे यांनी सांगितले आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास जनमाणसांमध्ये पोहोचवण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या धारकांनी मोहीम सुरू केली आहे.
मोठी बातमी! आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर; राखी ढसाढसा रडत म्हणाली…
या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानच्या ५० हजार धारकऱ्यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर ते किल्ले शिवनेरी असा २५ किलोमीटरचा डोंगरकड्यावरुन पायी प्रवास केला. यानंतर भाजपचे दोन आमदार आणि संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी हा मोहिमेचा समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी संभाजी भिडे भावनिक झाले होते.
उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही; बोर्डाने दिले आदेश