
चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा असतो. भारतात चहाचे प्रचंड शौकीन आहेत. त्यामुळे येथे चहाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. कुठेही जा तुम्हाला जागोजागी चहाच्या टपऱ्या दिसतील. भले भले शिक्षित लोकसुद्धा आजकाल चहाची टपरी टाकून पैसे कमवत आहेत. या व्यवसायात देखील आता स्पर्धा वाढली आहे. यामुळे चहा विक्रेते ( Tea Seller) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाय शोधत असतात.
बिग ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी
दरम्यान अशाच एका चहा विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ( Viral video) होत आहे. या चहा विक्रेत्याच्या अनोख्या अंदाजाने तो प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. या व्हिडीओमधील चहा विक्रेता अनेक फिल्मी डायलॉग बोलताना दिसत असून तो कलाकारांची नक्कल देखील करत आहे. बॉलिवूडच्या कलाकारांची हुबेहुब नक्कल करणारा या चहा विक्रेत्याजवळ लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
जेष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन! मोठा मतदारवर्ग आपल्या बाजूला करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मोठा प्लॅन
मकर संक्रांतीनिमित्त ‘या’ गावात पतंग उडवण्यास बंदी!
अमिताभ बच्चन, हृतिक रोशन आणि अमरीश पुरी यांसारख्या कलाकारांच्या जुन्या सिनेमांमधील डायलॉग म्हणत हा चहावाला ग्राहकांशी संवाद साधताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चहावाल्याला ‘देशातील सर्वात टॅलेंटेड चहावाला’ ( Most talented Tea seller) असे म्हंटण्यात आले आहे.
‘या’ राजकीय महानाट्याचे सुद्धा फडणवीसच सूत्रधार; म्हणून तर सत्यजित तांबेंनी पाहिले आमदारकीचे स्वप्न!