मुंबई : करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasvi Prakash) हे सध्या छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. चाहते या जोडीला खूप प्रेम देतात. त्यांना एकत्र पाहण्यास चाहते कायम उत्सुक असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या लग्नाबाबत अनेकवेळा अनेक अटकळ बांधले जातात. सध्या तरी चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे. करण कुंद्राने स्वत: त्याच्या लग्नाबद्दल सांगितले आहे.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा बिग बॉसच्या १५व्या सीझनमध्ये जवळ आले होते. तेजस्वी या शोची विजेती होती. शोच्या वेळेपासूनच या दोघांच्या केमिस्ट्रीने सर्वांची मने जिंकली होती आणि चाहते त्यांना तेजरन म्हणत. त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
एका मुलाखतीमध्ये करण कुंद्राला त्याच्या चाहत्यांकडून तेजस्वीच्या नात्याबद्दलही विचारले गेले आणि यावेळी त्याला लग्नाबद्दल देखील विचारण्यात आले. तेव्हा त्याने “लवकरच होईल” असे सांगितले. करण कुंद्रा म्हणतो की “सर्व काही चांगले चालले आहे, सर्वकाही चांगले चालले आहे”. यानंतर तो पुढे म्हणतो की “मियाँ भी राझी, बीवी भी राझी, काझी भी राझी”.