
मुंबई : बिहारचे (Bihar) उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत गेले आहेत. यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये अनेक जेष्ठ-वरिष्ठांच्या गाठीभेठी घेतल्या. तेजस्वी यादव दिल्लीमध्ये दाखल झाल्यांनतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्यामंडे प्रादेशिक पक्षाचं काय केलं ते पाहिलं , जो घाबरेल त्याला त्याला ईडीचा धाक दाखवून घाबरवलं आणि जो खरेदी करता येईल त्याला खरेदी केलं, पण बिहारी विकला जाणारा नाही, असे बोलत त्यांनी शिंदे गटालाही टोला लगावला आहे.
त्याचबरोबर त्यांनी भाजपाला मोठा लबाड पक्ष देखील म्हंटले आहे. सध्या बेरोजगारीची चर्चा सगळीकडे होत आहे पण भाजपाला त्याच काहीही देणंघेणं नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. भाजप राज्यात 19 लाख नोकऱ्या देण्याचेफक्त बोलत आहे पण त्यांनीही 19 नोकऱ्या दिल्या का? त्याचबरोबर ते देशात 2 कोटी नोकऱ्या देण्याचे बोलायचे पण त्यांनी फक्त ८० लाख नोकऱ्या दिल्या.
BJP talked about giving 19 lakh jobs in the state, did they even give 19 jobs? Similarly, they talked about providing 2 crore jobs in the country but they gave mere 80 lakh jobs: Bihar Deputy CM Tejashwi Yadav pic.twitter.com/7qT2yGGGpk
— ANI (@ANI) August 12, 2022
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणामध्ये उलथापालथ चालू आहे. नितीश कुमार यांनी राजदच्या पाठिंब्याने 10 ऑगस्ट रोजी बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन केले. यावेळी नितीश मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार देखील आता लवकरात लवकर होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिली.