Site icon e लोकहित | Marathi News

तेजस्विनी पंडितचा मोठा खुलासा; थेट नगरसेवकानेच दिली ‘ही’ ऑफर

Tejaswini Pandit's big revelation; The corporator himself gave 'this' offer

रानबाजार पाठोपाठ अथांग वेबसिरीजमुळे तेजस्विनी पंडित मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. रानबाजार मध्ये दिलेल्या बोल्ड सीन्समुळे मागील काही दिवसांपूर्वी ट्रोल झाली होती. सोशल मीडियावर देखील ती चांगलीच ऍक्टिव्ह असते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तेजस्विनी पंडितने मोठा खुलासा केला आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मोठी मागणी

अथांग वेबसिरीजच्या ( Athang Webseries) निमित्ताने झालेल्या मुलाखतीमध्ये तेजस्विनीने आपल्या आयुष्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेची माहिती दिली आहे. यामध्ये तिने आपल्याला एका नगरसेवकाने ऑफर देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले आहे. तेजस्विनी पंडितच्या या खुलाशामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

शिक्षक की राक्षस! चौथीच्या विद्यार्थ्याला पहिल्या मजल्यावरून दिलं खाली फेकून

तेजस्विनी पंडित काही वर्षांपूर्वी पुण्यात सिंहगड रोडला ( Sinhgad Road) राहत होती. यावेळी तिने एका नगरसेवकाचे घर राहण्यासाठी भाड्याने घेतले होते. दरम्यान एकदा घराचे भाडे देण्यासाठी तेजस्विनी नगरसेवकाच्या ऑफिसला गेली होती. त्यावेळी त्या नगरसेवकाने तिला थेट ऑफरच दिली होती.

ब्रेकिंग: मुंबई हायकोर्टाचा गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मोठा निर्णय

त्यावेळी तिथे असणाऱ्या पाण्याच्या ग्लासमधील पाणी तेजस्विनीने त्या नगरसेवकाच्या तोंडावर फेकले होते. लोक कला क्षेत्राकडे कसे बघतात? हे त्याप्रसंगी कळले. अशी माहिती तेजस्विनी पंडित हिने यावेळी दिली. कलाविश्वात अशा चुकीच्या पद्धतीने पैसे कमवायचे असते, तर मी आतापर्यंत गाड्या, घरं अशा अनेक गोष्टी घेतल्या असत्या. असे म्हणत तेजस्विनीने कला क्षेत्रात काम करणे किती कठीण असते ? याबाबत माहिती दिली आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का! सेनेचं कार्यालय मिळालं शिंदे गटाला

Spread the love
Exit mobile version