
अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात होत आहेत. दररोज आपल्याला अपघाताच्या घटना ऐकायला मिळत आहेत. काही अपघात रस्ते खराब असल्यामुळे होत आहेत. तर काही अपघात रस्ते चांगले असून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होत आहेत. सध्या देखील महाराष्ट्रातील नागपुरातून एक भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांपा गावाजवळ नागपूरहून नागभीडकडे येणारी कार आणि खासगी बस यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 पुरुष आणि 3 महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. त्याचबरोबर या अपघातामध्ये २ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमृता फडणवीस धमकी प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती! शरद पवारांसह ‘या’ बड्या नेत्यांची नावे चर्चेत
हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी कार कापून मृतदेह बाहेर काढला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांना जीव गमवावा लागला असून अन्य तीन नातेवाईकांचा देखील मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे.
कोण आहे अभिषेक पर्वते? एका अपघाताने जीवनच पालटले; आता ‘या’ व्यवसायांचा आहे मालक!