आज पहाटेच्या वेळी मुंबई नाशिक महामार्गावरील ( Mumbai Nashik Highway ) कसारा घाटातील हॉटेल ऑरेंज समोर भीषण अपघात झाला. हा अपघात कंटेनर पिकअप आणि ओम्नी कार यामध्ये झाला. या अपघाता दरम्यान चालत जाणाऱ्या दोन जैन महिलांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
भटक्या कुत्र्यांना टाकले प्रेयसीच्या शरीराचे तुकडे, मीरा रोडमधील घटनेबाबत समोर आली धक्कादायक माहिती
पहाटेच्या सुमारास कसारा घाटातून ( Kasara Ghat ) नाशिकला पायी प्रवास करणाऱ्या या महिला नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी परमपूज्य सिद्धाकाजी व हर्षाईकाजी येथून प्रवास करत येत होत्या. यावेळी कंटेनर आणि ओम्नी यांमध्ये जोरदार धडक बसल्याने दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला.
आनंदाची बातमी! मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान खात्याने दिली माहिती
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्हीही महिलांचे मृतदेह शवच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले. व अपघात स्थळी तपासणी करून गुन्हे दाखल केले. या घटनेची अधिक माहिती पोलीस तपासत आहेत.