
Bus Accident । वाहतुकीचे नियम (Traffic rules) कडक केले असले तरी आजही वाहनचालकांच्या चुकीमुळे अनेक अपघात होतात. या अपघातांमुळे (Accident) अनेक जणांचे संसार उध्वस्त होतात. अपघातात अनेकांना कायमचे अपंगत्व येते तर काहींना आपले प्राण गमवावे लागते. असाच एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. अपघातात एकाचा जणाचा मृत्यू तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)
Salman Khan । सलमानची ‘ती’ अवस्था पाहून चाहत्यांना चिंता; म्हणाले, ‘काळजी घे’
मिळालेल्या माहितीनुसार, एक खाजगी बस पणजीहून हैदराबादला (Bus Accident at Goa) चालली होती. यात 23 प्रवासी आणि तीन चालक होते. त्यावेळी धारबांदोडा येथे रस्त्याच्या एका वळणावर बस आल्याने चालकाचं बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस खड्ड्यात (Accident at Goa) पलटी झाली. बसमधील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व प्रवाशांना बाहेर काढले.
Nanded Hospital । नांदेडच्या मृत्यूतांडवांनंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी केले गंभीर आरोप
या भीषण अपघातात बसचा चालक गाडीखाली आला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आणि इतर दोन चालक, 23 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडले आहे.