अपघाताच्या (Accident) घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात होतच आहेत. दरम्यान सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर-कल्याण महामार्गावर आळे फाट्याजवळील लवणवाडी (ता. जुन्नर) येथे मालवाहतूक वाहनाने दोन दुचाकींना धडक दिली आहे.
मोठी बातमी! कांदा अनुदानाला 200 क्विंटलची मर्यादा
हा अपघात एवढा भीषण होता की , या अपघातामध्ये दुचाकींवरील पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जण पारनेर तालुक्यातील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.
मोठी बातमी! शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण
माहितीनुसार, या अपघातामध्ये मृत्यू झालेले पाच जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन चिमुकल्यांसह तीन जणांचा समावेश आहे. हा अपघात सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला आहे.
ठाकरेंच्या अडचणीत वाढ! आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राऊतांना समन्स