वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ताम्हिणी घाट पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात पर्यटक या घाटाला भेट देण्यासाठी आवश्य येतात. दरम्यान हा ताम्हिणी घाट (tamhini ghat)धोकादायक ठरला आहे.कारण माणगाव-पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात शनिवारी (20 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजता एक कार 200 फूट घसरली. दरम्यान या कार अपघातात(accident) तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव(mangav) येथील खासगी रुग्णालयात(hospital) उपचार सुरू आहेत.अपघातात या कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे आणि कृष्णा राठोड अशी मृतांची नावे आहेत.तर रोशन गाडे, प्रवीण सरकटे, रोशन चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय घडली?
वाशिम(vashim) जिल्ह्यातील काही तरुण कोकणात देवगडला भेट देण्यासाठी गेले होते.दरम्यान तेथून परतत असताना माणगाव-पुणे रस्त्यावर हा अपघात झाला.ताम्हिणी घाटाजवळील वळणावर पडलेल्या खडकावर धडकल्याने कारचा तोल बिघडून कार 200 फूट दरीत कोसळली.कारमध्ये उपस्थित तीन जणांचा मृत्यू झाला होता तर तीन तरुण जखमी अवस्थेत कारमध्ये अडकले होते.रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.पोलीस आणि बचाव पथकाने बाहेर काढले.यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जखमी तरुणांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात तीन जखमींवर उपचार सुरू
या भीषण अपघाताची माहिती मिळताच माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.तीव्र उतार असलेल्या खोऱ्या पावसात प्राणघातक ठरतात.याप्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत. शनिवारची अशी संध्याकाळ त्या तीन तरुणांसाठी जीवघेणी ठरली.