सध्या हिंगोलीमधूल अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (A shocking incident of accident in Hingoli) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर माळेगावजवळ या ठिकाणी एक भीषण अपघात झाला आहे. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीने उभ्या असलेल्या फरशीने भरलेल्या मालमोटरीला समोरून धडक दिल्याची घटना घडली आहे.
Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना वयोवृद्ध आजोबा जमिनीवर कोसळले अन् त्यानंतर…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये पाचजणांसह एकूण १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन जण गंभीर जखमी आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे तेथील भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये एकजण राजस्थानचा आहे तर बाकी चार जण मध्यप्रदेशचे आहेत. माहितीनुसार, राजस्थान येथील एक मालमोटर २०० हूनअधिक मेंढ्या भरून हैदराबादकडे निघाला होता. यावेळी माळेगावजवळ भीषण अपघात झाला आणि जवळपास १९० मेंढ्यांचा मृत्यू झाला.
मान्सून संदर्भात समोर आली सर्वात मोठी अपडेट! हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती