Nana Patole । मोठी बातमी! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात, गाडीचे मोठे नुकसान

Nana Patole

Nana Patole । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha election) रणधुमाळी सुरु आहे. राजकीय वर्तुळातून सध्या एक मोठी घटना समोर येत आहे. भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून माघारी येत असताना ट्रकने मागून जोरात धडक दिली. या अपघातात नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. (Nana Patole Car Accident)

Udayanraje Bhosale । आज संपणार साताऱ्याचा सस्पेन्स, भाजपकडून मिळणार उदयनराजेंना संधी?

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली. काल रात्रीच्या दरम्यान प्रचारांनतर सुकळी या गावी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक (Nana Patole Accident) दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात नाना पटोले यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Latest maarthi news)

Crime News । आईच्या नात्याला काळिमा! घेतला पोटच्याच लेकरांचा जीव, कारण वाचून बसेल धक्का

दरम्यान, नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा करून परतत होते. त्यावेळी ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने मागून जोरात धडक दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाना पटोले हे ज्या कारमध्ये बसले होते, त्यांच्या कारच्या मागच्या भागाचा चुराडा झाला आहे. सुदैवानं नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणाला दुखापत झाली नाही.

Sharad Pawar । मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला

Spread the love