पुणे-सोलापूर मार्गावर श्रीगोंद्यातील स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात! एक जण जागीच ठार

Terrible accident of Swift train in Srigonda on Pune-Solapur route! One person died on the spot

दौंड: दौंड तालुक्यातील मळद येथे शुक्रवारी सायंकाळी 6:00 वाजण्याचा दरम्यान पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) रस्त्याच्या भुयारी मार्गावर लोखंडी सुरक्षाकठडे बसवणार्‍या कंत्राटदाराच्या उभ्या असलेल्या महेंद्र बोलेरो पिकअपला पाठीमागून वेगात येणाऱ्या मारुती स्विफ्ट (Swift) डिझायर गाडीने धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार होऊन दोन जण गंभीर जखमी आहेत.

मळद येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील भुयारी मार्गावरील लोखंडी सुरक्षाकठडे दुरूस्तीचे काम करण्यात येत होते. यावेळी त्या ठिकाणचे काम संपल्यानंतर ठेकेदाराचे कामगार व पिकअप चालक पिकअप रस्त्याच्या कडेला उभे करून चहा प्यायला गेले. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात जाणारी मारूती स्विफ्ट डिझायर गाडी पिकअपला पाठीमागून धडकली.

पण, या अपघातातील स्विफ्ट गाडी श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. दौंडमधील खाजगी रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरु आहे. पिकअप चालकाच्या निष्काळजीपणामुळे एकाला जिव गमवावा लागला. अन दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये स्विफ्ट गाडीचा अक्षरश चेंदामेंदा झाला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *