पंढरपूर देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाचा मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ( Ratnagiri Nagpur National Highway ) भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टर आणि चारचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन मुली जखमी आहेत. हे कुटुंब कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील स्थायिक आहेत. हे चारचाकी गाडीतून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. परंतु काल सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान हा अपघात झाला.
“मॉडेलिंग क्षेत्रात या आणि बक्कळ पैसा कमवा”, असे सांगून पुण्यातील तरुणांबाबत घडला धक्कादायक प्रकार
चारचाकीला ट्रॅक्टरचा धक्का बसल्याने ट्रॅक्टरच्या पुढील भाग चारचाकीत घुसल्याने पाच जण जागीच ठार झाले. व दोन मुली जखमी झाल्या आहेत. आता जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. माहितीनुसार, साक्षी जयवंत पोवार आणि श्रावणी जयवंत पोवार या दोघी जखमी झाल्या आहेत.
सोलापूरच्या शेतकऱ्याने चक्क आंब्याला दिलं शरद पवार यांचं नाव; कारणही केलं स्पष्ट…
पोवार यांचे कुटुंब आणि इचलकरंजीचे त्यांचे पाहुणे असे सर्वजण मिळून ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालले होते. वड्डी येथे राजीवनगर येथे बायपासला हा अपघात झाला आहे. श्रावणीच्या मेंदूला मार बसला असून साक्षीच्या पायाला दुखापत झाली आहे. या दोघींवरही मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या दोघींच्या कुटुंबातील सर्व सदस्य मृत झाल्याने या दोघींना आधार नसल्याने त्यांच्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच, पहिल्यांदाच घडलं असं; गौतमीच मार्केट डाऊन?