देशात सतत अपघात (Accident) होत असतात. या अपघातात अनेकांना आपले जीव गमवावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे की भारतात वाहतुकीचे नियम (Traffic rules) कडक करूनही अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. बरेच अपघात चालकांच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे पाहायला मिळतात. अशातच आता एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
शिर्डीमधील काही भाविक पंढरपुरातील (Pandharpur) विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. विठुरायाचे दर्शन करून हे भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी निघाले हाेते. परंतु पंढरपूर शहरातील तीन रस्ता चौकात भाविकांच्या मिनीबसचा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले.
या अपघातात चालक आणि एका भाविकाला जास्त मार लागला आहे. तसेच दहा ते पंधरा भाविक जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती पंढरपूर ग्रामीण रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.