सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेरमध्ये दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे तर यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनने तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक! आयटी इंजिनिअरने पत्नी व मुलाचा खून करून केली आत्महत्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर -अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारामध्ये ही धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमधील जखमी तरुणाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला असून या प्रकरणात पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतलं आहे.
कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या; तरुणाच्या त्रासाला कंटाळून घेतला निर्णय
माहितीनुसार, संगमनेर -अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारामध्ये या टँकरने तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात ऋषीकेश हासे, सुयोग हासे, निलेश सिनारे या तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
“तो वाढदिवसाचा केक कापणारचं होता तेवढ्यात घडलं असं की…”, पाहा व्हायरल VIDEO