अपघाताच्या घटना सतत कुठे ना कुठे घडत आहे. या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सध्या अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती येथील दर्यापूर (Daryapur in Amravati) येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावतीमधील दर्यापूर तालुक्यातील जे. डी. पाटील महाविद्यालयाच्या (J. D. Patil College) शिबिरातून विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमधून बसवून परतीचा प्रवास केला जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली पलटी झाली आणि हा भीषण अपघात झाला.
नाशिकच्या पान हाऊसमध्ये मिळते चक्क दीड लाखांचे पान! खवय्यांची होते गर्दी
यामध्ये अपघातामध्ये २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत तर यामधील काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. आता जखमी विद्यार्थ्यांवर अमरावतीच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.
“…तर इलॉन मस्क पेक्षा मी जास्त श्रीमंत असतो”, योगगुरू रामदेव बाबा यांचे विधान चर्चेत