Crime News । भयानक! रमी सर्कल गेममुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर, घेतला टोकाचा निर्णय अन्….

Terrible! Due to rummy circle game, a mountain of debt on the head, took an extreme decision and….

Crime News । मुंबई : अलीकडच्या काळात पैशाला (Money) खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणतीही गोष्ट खरेदी करायची असेल तर त्यासाठी पैसा लागतोच. अनेकजण पैसे कमावण्यासाठी नोकरी करतात किंवा स्वतःचा एखादा व्यवसाय (Business) सुरु करतात. काहीजण कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करतात. तर काहीजणांना कोणतेही कष्ट न करता पैसे कमवायचे असतात. (Latest Marathi News)

Tripti Desai । बारामतीत सुप्रिया सुळेंना काटें की टक्कर! तृप्ती देसाई लढणार निवडणूक, म्हणाल्या, “भाजपाने…”

त्यासाठी काही जण ऑनलाइन गेम (Online game) खेळून पैसे कमावण्याचा मार्ग निवडतात. परंतु, यामध्ये खूप आर्थिक जोखीम असते. प्रत्येक वेळी यातून निश्चित परतावा येईलच असे नाही. अनेकजण ऑनलाइन गेम खेळून कर्जबाजारी झाले आहेत. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका तरुण ऑनलाइन रमी सर्कल गेम (Rummy circle game) खेळून कर्जबाजारी झाला आहे. परंतु हे कर्ज फेडण्यासाठी त्याने टोकाचा निर्णय घेतला आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा! म्हणाले; “भाजपमध्ये सगळे आयाराम…

डोक्यावर असणारे कर्ज फेडण्यासाठी या तरुणाने चक्क एका वयोवृद्ध महिलेला लुटले आहे. नितीन ठाकरे असे या तरुणाचे नाव असून त्याला डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ७० वर्षीय वयोवृद्ध महिला डोंबिवली पश्चिमेतील गांधी उद्यान परिसरामध्ये असणाऱ्या रेल्वे पुलाच्या जिन्यातून डोंबिवली पूर्वेकडे येत होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.

Ajit Pawar । सत्तेसाठी नाही तर ‘या’ कारणामुळे अजित पवार भाजपसोबत, महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचा दावा

दरम्यान, हा सर्व प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका तरुणाने पाहिला. त्याने पाठलाग करून त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणानंतर पुन्हा एकदा ऑनलाइन गेमचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Amit Thackeray । मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक, सरकारविरोधात आजपासून जागर पदयात्रा

Spread the love