भयानक! तब्ब्ल ६ वर्षांपासून आईच्या मृतदेहासोबत राहत होता, धक्कादायक कारणही आलं समोर

Terrible! Tabl was living with his mother's dead body for 6 years, a shocking reason also came to light

सध्या इटलीमधून (Italy) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मुलगा तब्बल ६ वर्ष त्याच्या आईच्या मृतदेहासोबत राहत होता. यामागील जे कारण समोर आलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. आईची पेन्शन मिळवण्यासाठी आपण असं केल्याचे या व्यक्तीने कबूल केले आहे. त्यामुळे अनेकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता

तो त्याच्या मृत आईच्या निवृत्ती निधीतून पैसे घेत होता. आरोपी मुलाचे वय ६० वर्षे आहे. आपल्याला आईची पेन्शन कायम मिळत राहावी म्हणून तो त्याच्या मृत आईसोबत राहत होता. डेली स्टारच्या वृत्तानुसार, आरोपीच्या मृत आईचे नाव हेल्गा मारिया हेंगबर्थ असे आहे.

भीषण अपघात! कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, तर २ जण गंभीर जखमी

या व्यक्तीने त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना सांगितले की हेल्गा तिच्या देशात, जर्मनीला परत गेली आहे. तो गेल्या सहा वर्षांपासून मृतदेहासोबत राहत होता आतापर्यंत १५६,००० पाऊंड म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १.५९ कोटी रुपये मिळाले आहेत. एका आपत्कालीन घटनेमुळे पोलिसांना आणि अग्निशाम दलाला इमारतीमध्ये प्रवेश करावा लागला होता यावेळी त्यांनी हा पर्दाफाश केला आहे.

संतापजनक घटना! सावकाराने तीन हजार रुपयांसाठी तरुणाच्या डोळ्यात मिरची टाकून केली मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *