Site icon e लोकहित | Marathi News

Pakistan Terror Attack । धक्कादायक! पाकिस्तानात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ चिनी नागरिकांचा मृत्यू

Pakistan Terror Attack

Pakistan Terror Attack । एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) एक आत्मघाती हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ५ चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हल्ल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Terror Attack)

Satara Loksabha । अजितदादांची नवी खेळी! ‘त्या’ जागेच्या बदल्यात मागितलेल्या जागेमुळे वाढली शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी

विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठा दहशतवादी हल्ला झाला असून खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी नागरिक आणि एक स्थानिक ड्रायव्हर मारले गेले आहेत. (Terror Attack in Pakistan) मृत व्यक्ती पेशाने इंजिनिअर होते. ते पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी काम करत होते. वृत्तानुसार, एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन चिनी अभियंत्यांच्या ताफ्यात घुसवले.

Dharashiv News । धाराशिवमध्ये तुंबळ हाणामारी! पाच जखमी तर 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

यापूर्वीही पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले होते. या हल्ल्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केले होते. पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त प्रकल्प, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला विरोध होत असल्याने हे हल्ले झाले आहेत, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, या आत्मघाती हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढेल, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

Satara Loksabha । उदयनराजेंविरोधात बिचुकले लोकसभेच्या मैदानात! साताऱ्यात होणार कांटे की टक्कर

Spread the love
Exit mobile version