इंदापूर (Indapur) तालुक्यातील सणसर (Sansar) गावातून 6 शेळ्या (Goats ) आणि 3 बोकड (Buck) अज्ञात चोरट्यांनी रात्री चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मोठी बातमी! आदिलच्या अटकेनंतर राखी सावंतला मिळतायेत धमक्या
घरफोड, लूटमार अशा घटना तर होत आहेतच. मात्र, आता चोरट्यांकडून पशुधन चोरले जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. याबाबत मीना अशोक पाठक (वय 50) व्यावसाय शेळी पालन रा. सणसर शंभुनगर ता. इंदापूर जि. पुणे आणि दत्तात्रय तुळशीदास पाठक (वय 32 ) यांनी फिर्याद दिली आहे.
बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, म्हणाले “येत्या १५ दिवसांत…”
फिर्यादी म्हटले आहे की, गुरुवारी (दि. 9) सायंकाळी शेतातून शेळ्या चारुन आणल्यानंतर 7 च्या सुमारास गोठ्यात बांधल्या होत्या. शुक्रवारी पहाटे 2च्या सुमारास शेळ्या व बोकड अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या फायद्याकरीता फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने एकूण 9 शेळ्या चोरून नेल्या आहेत.
महेंद्रसिंग धोनी झाला शेतकरी, फोटो शेअर करत चाहत्यांना तिला धक्का!
या फिर्यादीवरुन वालचंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्याचे अस्सल देशी जातीच्या 6 शेळ्या आणि मोठी 3 बोकडे अज्ञात चोरांनी लंपास केले आहेत. या शेळ्या चांगल्या जातीच्या असल्यामुळे आणि बोकडे देखील वजनदार असल्याने शेतकऱ्याचे जवळपास लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. आता या चोरीमुळे पुन्हा शेळीपालनाचा व्यवसाय करावा की नाही? असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. तसेच या घटनेनंतर सणसर परिसरात खळबळ उडाली आहे.
(प्रतिनिधी – ऋतुजा थोरात)
सोलापूर लोकसभेच्या जागेवरून वातावरण पेटले! आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “कोण रोहित पवार?”