Thackeray Group । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे गट पडले. यानंतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आणि शिंदे गटाची इन्कमिंग सुरू झाली. दरम्यान पुन्हा एकदा ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसल्याची माहिती मिळत आहे. देवळाली मतदारसंघाचे 25 वर्ष प्रतिनिधित्व केलेले शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिले आमदार माजी समाज कल्याण मंत्री नेते आणि उपनेते बबनराव घोलप यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. (Thackeray Group )
माहितीनुसार, बबनराव घोलप यांना संपर्कप्रमुख पदावरून हटवल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात आणि ठाकरे गटांमध्ये चांगलीच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
Bank Deposit । काय सांगता! रातोरात ४० जण झाले लखपती, अचानक खात्यात आले २ लाख रुपये
शिवसेना ठाकरे गट शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरून हटवले असल्यामुळे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी राजीनामा देखील दिला आहे. त्याचबरोबर आता बबनराव घोलप पुढे कोणता राजकीय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते कोणत्या पक्षात जाणार याकडे देखील सर्व सर्वांचे लक्ष लागले आहे.