![Thackeray group again runs to Supreme Court against Rahul Narvekar](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2023/09/Shivsena--1024x576.jpg)
Shivsena । मुंबई : शिवसेनेच्या सत्तासंघर्षाचा पेच अजून सुटला नाही. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्यायची की नाही, याबाबत येत्या 20 ऑक्टोबरला मोठा निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)
Dasara Melava । शिंदे की ठाकरे गट? यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार, दोन्ही गटाकडून अर्ज दाखल
अशातच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात धाव घेतली आहे. ‘आमदार अपात्रतेचा मुद्दा सोडून राहुल नार्वेकर इतर विषयात वेळ घालवत आहेत’, असा आरोप ठाकरे गटाकडून केला आहे. ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी सुप्रीम कोर्टात याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
Export Business । ‘या’ सोप्या पद्धतीने विका परदेशात शेतमाल, परवाना कसा काढावा? जाणून घ्या
ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी 13 ऑक्टोबरला सुनावणी होईल असे स्पष्ट केले. त्यासाठी एक संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. परंतु जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकावर ठाकरे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे पुढे काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.