Election Commission । राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु असून दिवसेंदिवस निवडणुकांमुळे (Loksabha election) राज्याचे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे. (Loksabha election 2024)
Mamata Banerjee । ममता बॅनर्जी यांचा पुन्हा अपघात, हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला आणि….
सध्या ठाकरे गटाचे प्रचार गीत चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण निवडणूक आयोगाने ‘जय भवानी’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावली होती.पण ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज दाखल केला होता. आता हा अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला असला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Nasim Khan । काँग्रेसमधील दलाल नेता कोण? नसीम खान यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट
फेरविचार अर्ज फेटाळला असल्याने या प्रकरणी आता ठाकरे गटाला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागेल. असे असले तरी ठाकरे गटाने यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रचार गीतातील कोणताही शब्द वगळणार नाही असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. ठाकरे गटाकडून फेरविचार याचिका दाखल केली जाणार का? असा सवाल निर्माण केला जात आहे.
Sharad Pawar । “शिवसेनेत शरद पवारांनी चार वेळा फूट पाडली,” ‘या’ नेत्याची जहरी टीका