
शिंदे-फडणवीस सरकारचा आयोध्या दौरा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दौऱ्यासाठी अयोध्येत गेले असून यावेळी त्यांनी प्रभु श्री रामाचे दर्शन घेत, राम मंदिराच्या कामाची पाहणी केली. या आयोध्या ( Aayodhya) दौऱ्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान ठाकरे गटाने ( Thackeray Group) देखील शिंदे-फडणवीस सरकारला आयोध्या दौऱ्यावरून चांगलेच सुनावले आहे.
गौतमी लग्नबंधनात अडकणार? म्हणाली, “आयुष्यात एक तरी पुरुष…”
महाराष्ट्रात ( Maharashtra) अवकाळी पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. राज्यात अशी परिस्थिती असताना संपूर्ण मंत्रिमंडळ आयोध्येमधील उत्सवात आणि रामभक्तीत अडकले आहे. हे राम राज्याचे चित्र नाही. अशी टीका ठाकरे गटाने ‘सामना’ मधून केली आहे.
उष्माघात घेऊ शकतो जीव! वेळीच घ्या ‘अशी’ काळजी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांचे श्रीरामांच्या लढ्यात मोठे योगदान होते. यामुळे शिवसेनेचे अयोध्येशी एक प्रकारचे भावनिक नाते आहे. यापुढेही हे नाते टिकून राहील. आता जे लोक अयोध्येत ( Aayodhya) जाऊन नकली शिवसेनेचा जयजयकार करत आहेत तो खोक्यांमधून निर्माण झालेला अहंकार आहे. हे एक ढोंग आहे. मात्र आयोध्येत पाप आणि अहंकारास थारा नाही. याची जाणीव त्यांना भविष्यात होईल. असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
मंदिरात आरती सुरू होती अन् अचानक झाड कोसळलं; ७ भाविक जागीच ठार तर ३५ जण गंभीर जखमी